Thursday, November 8, 2018

आणि ... डॉ. काशिनाथ घाणेकर




बऱ्याच दिवसांनी एखादा मराठी चित्रपट थेटरात जाऊन बघितला. whatsapp च्या पोस्ट्स ला बळी पडून नव्हे. तर चित्रपटाच्या ट्रेलर ला भुलून.

एखाद्या कलावंताचं आयुष्य पडद्यावर आणणारा हा काही पहिला चित्रपट नाही आणि शेवटचा पण नसेल. पण हा चित्रपट लक्षात राहणारा मात्र नक्कीच आहे.
एका दंतवैद्याची नाट्यक्षेत्रात काम करण्यासाठीची धडपड दाखवत चित्रपट सुरु होतो. त्यानंतर मग कष्टानं मिळवलेलं यश, पण त्या यशाची चढलेली नशा, नाट्यक्षेत्रातले प्रतिस्पर्धी, मित्र, व्यक्तिगत जीवनातले चढउतार, अपयशाची परत एकदा भेट, लोकप्रियतेची लागलेली चटक, व्यसनाधीनता अशा कितीतरी वळणावळणाच्या वाटेवरून हा प्रवास पुढे पुढे सरकत राहतो. आणि महत्वाचं म्हणजे प्रेक्षक देखील तितकाच गुंतून जातो, प्रेक्षक त्या प्रवासाचा एक भाग नक्कीच बनून जातो.
त्यामुळंच जेव्हा काशिनाथच्या अभिनयासाठी चित्रपटात टाळ्या किंवा शिट्ट्या पडतात, तेव्हा त्या आपल्याला पण वाजवाव्याशा वाटतात, आणि काशिनाथ जेव्हा चुकीचं वागतो तेव्हा त्याचा तितकाच राग  देखील येतो, आणि हेच या चित्रपटाचं यश आहे. अर्थात त्या यशात सिंहाचा वाटा हा सुबोध भावेचा आहे, डॉक्टरांची भूमिका त्यानं खरंच जिवंत केली आहे. बाकीच्या अभिनेत्यांनी दिलेली साथ तितकीच मोलाची आहे, पण चित्रपटभर व्यापून राहणं आणि नंतरही उरणं म्हणजे काय ते सुबोधचा अभिनय बघून लक्षात येतं.

एका अर्थानं बघायला गेलं तर डॉ काशिनाथ घाणेकर हे मराठी नाट्यभूमीतले 'संजू' होते असं म्हणायला हरकत नाही. त्यांचं आयुष्य (आणि मृत्यूही) हे तितकंच नाट्यमय होतं, त्यात कष्ट, यश-अपयश, चढउतार, व्यसनं, प्रेम प्रकरणं असा सगळा मसाला खरं  तर ठासून भरला आहे. पण लेखक-दिग्दर्शकानं हा फक्त मसाला चित्रपट म्हणून मांडलेला नाही, तर एखादा कलावंत जेव्हा आपलं आयुष्य जगत असतो तेव्हा त्याला कोणकोणत्या पातळीवर संघर्ष करावा लागतो, आणि तो संघर्ष करणारा शेवटी तोहि एक माणूसच असतो हे दाखवण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. कलावंतांच्या वैयक्तिक जीवनातले चढ उतार व्यावसायिक जीवनात कसे प्रभावी किंवा धोकादायी ठरू शकतात यावर देखील चित्रपट प्रकाश टाकतो.
एकंदरीतच अभिनय, लेखन, दिग्दर्शन, संवाद अशा सर्वच गोष्टींसाठी आणि मराठी रंगभूमीच्या इतिहासातलं एक सोनेरी म्हणता येणार नाही, पण 'रसरसतं-धगधगतं' पान वाचण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघितला पाहिजे. 

Wednesday, January 3, 2018

Shubh Mangal Saavdhan - movie review

First things first!
Movies like Shubh Mangal Savdhan (SMS) should be made.
It's a good movie.
It's enjoyable and different from regular rom-com movies made in Hindi.
You need to be creative to comment on delicate subjects like erectile dysfunction, in a light-hearted and engaging way. The performances and writing have to be top-notch otherwise it will be a boring lecture for viewers. SMS delivers on all these fronts, story is good and nicely narrated, movie length is apt, performances are up to the mark (of EACH and EVERY actor/actress).

Having said that, you have to walk on the edge and shouldn't loose the track between entertainment and the message that you want to pass on, otherwise you would be very preachy or only masala movie. This is where the movie lacks and it does loose the track. There are some scenes where you don't believe what is happening, you feel this much exaggeration is not required. The movie bends more towards the entertainment in some scenes, although it does gather some laughs, viewers won't relate to such scenes.

But, overall if you look at the bigger picture or the message/s this movie is trying to pass on, you will forgive all such wrong detours the movie takes. So this movie should be definitely watched.

Monday, January 1, 2018

वर्तुळ


*******************
"आरं २-४ खिळे जास्तच पेरत जा लेका …. आपण ४ खिळे टाकले कि त्यातला एखाद-दुसरा कामाला येतो … नको तिथं आळस करत जाऊ नगो"… परश्या आपल्या पोराला सकाळी सकाळी दटावत होता.
"कालचा खिळा त्या गिऱ्हाईकान कुट टाकला काय कळना …. गावलाच न्हाई … आणि आजकाल राजूदादा पण खिळ्याच पैशे जास्त घेतूया …. नवीन खीळे आणणार तरी कुठनं?" सदा पण वैतागून उत्तरला…
"या धंद्यात काय बरकत न्हाय … आपली शेती बरी होती लेका, जाऊदे पण आता काय करणार … १० रुपये जास्तच लावू पंक्चर काढायचे"… असं म्हणून परश्यान दुकान उघडलं आणि उदबत्ती पेटवून देवाच्या तसबिरींना ओवाळायला सुरुवात केली.
सदानं त्यावर काही न बोलता पेपर उघडून वाचायला सुरुवात केली, तेवढ्यात कोणीतरी गिऱ्हाईक आलेलं दिसलं, 'चला पहिली भवानी तर झाली' म्हणून तो उठला आणि कामाला लागला…  
*******************
"जास्त वेळ बोलू शकणार नाही … आज डॉक्टर जरा घुश्श्यातच आहेत…. एवढ्यात कोणी पेशंट आला तर प्रोब्लेम होईल…  चल बाय नंतर बोलू" असं म्हणून मोहिनीने गडबडीने फोने ठेवून दिला.
तेवढ्यात तिच्या टेबलावरचा फोन वाजला, "हा डॉक्टर … हा ठीक आहे, हो चालेल. हा मी लक्षात ठेवून करेन सर. "
केसपेपरची किंमत १३० वरून अचानक १५० का केली डॉक्टरांनी याचा काही मोहिनीला उलगडा झाला नाही. तिने मात्र पडत्या फळाची आज्ञा मानून लक्षात राहण्यासाठी नवीन केसपेपरवर जास्तीची किंमत लिहून ठेवली. 
******************
"हे बघा, मला आजच आलेला अनुभव आहे … नुसते कानाला हात लावून बघायचे १५० रुपये घेतले डॉक्टरांनी … केसपेपरचे दीडशे वेगळे! कुठल्या जमान्यात आहे राव तुम्ही….  ३ किलोमीटर साठी १० नाही १५ रुपये लावत चला… " युनियन लीडर संग्राम आज भलत्याच जोशात आला होता.
"वाढत्या महागाईत वाहून जाल नाहीतर तुम्ही लोक सुध्दा …. हे बघा मतदानघेऊ, ज्यांना १५ रुपये रास्त वाटतात त्यांनी हात वर करा "
"व्हय …. महागाई कशी मारुतीच्या शेपटावाणी वाढतच चाललीया … " एरवी अबोल असणाऱ्या धोंडूनानांनी आज संग्रामची री ओढली आणि हात वर केला.
मतदान झालं, आणि संग्रामच्या अपेक्षेप्रमाणे दरवाढीचा प्रस्ताव अधिक करून रिक्षाचालकांनी उचलून धरला 
******************
"आज परत बटाटा? संपतोय का नाही त्यो?" दिवसभराच्या कामाला वैतागलेला परश्या बायकोवर खेकसला.
"आता तुमास्नी आणि काय सांगू, नेहमीची बाई जिच्याकडन भाजी घेते ती दर कमी करायलाच तयार नाई!  सगळ्या भाज्या अशाच २० आणि ३० रुपायला पावशेर …. परवडायचं कसं वो? आणि वर मलाच म्हणतीया कि बाई रिक्षाच भाडं बी डबल झालंया, मी भाजी जुन्या दरान कशी विकू?"
"मग काय बटाटा जास्त घेऊन आले परत!"
काय बोलावं काहीच न समजून, परश्याने नुसता हुंकार भरला आणि जेवायला सुरुवात केली. 
*****************
"एक चहा द्या मज आणुनी …. पिईन मी तो स्वप्राणाने "….  डॉक्टरांनी बूट काढता काढताच ओर्डर सोडली, "खूप वैताग आला राव आज… "
थोड्या वेळाने त्यांच्या पत्नीने चहा आणून दिला आणि विचारलं "का, काय झालं? पेशंट जास्त होते काय आज?"
"नाही फारसे नाहित… पण सकाळी निघालो आणि अर्ध्या वाटेत चाक पंक्चर झालं …स्टेपनीच चाक म्हणजे जुनंच होतं, ते पण पंक्चर झालं म्हणून काढून ठेवलेलं आणि त्याचं पंक्चर काढायचं राहून गेलं होतं…
दोन्ही चाकांच पंक्चर काढून घ्यावं म्हणून एका पंक्चर वाल्याकडे गेलो, तर त्याने दोन्हीचे मिळून दोनशे घेतले. बोटाएवढा खिळा निघाला चाकातून! त्यातच वेळ गेला बराच. "
"हं … आणि मोहिनी काय म्हणते … तिला काय सांगितलं? पगार वाढवून मागत होती ना ती?"
"होय …. दोन आठवड्यापासून विचारते आहे. वाढवतो एवढंच बोललो परवा तिला. नक्की आकडा ठरवला नाही अजून मी पण. "
अशा इकडच्या तिकडच्या गप्पा मारत चहा झाल्यावर डॉक्टरांनी विचारलं, "चिरंजीव कुठायत? किती वेळ खेळत असतोय हा?"
"आला आहे हो… समोरच्या आजोबांकडे गेलाय. त्याला शाळेत निबंधस्पर्धेसाठी एक निबंध लिहून हवाय मराठीमधून … त्यांच्याकडून मदत घेणार आहे. ते आजोबा मराठी मेडियम मधून शिकलेत ना!"
"मराठी मेडियम?? काहीही काय? माझंही मराठी चांगलंच आहे. मी पण मदत करू शकतो …. मला पण एक कागद, पेन आणून दे प्लीज!"
 पेन आणि वही आणून देताना "त्याचीच वही आहे … विषय लिहून ठेवलाय बघा त्याने ", असं सांगून बायको आपल्या कामाला निघून गेली. 
वहीच्या पानावर "महागाई आणि समाजाची बदलती मानसिकता" एवढंच लिहिलं होतं आणि पूर्ण पान कोरं होतं …. 
कितीतरी वेळ त्या मोकळ्या पानाकडे बघितल्यावर त्यांनी तिथे हातानेच एक वर्तुळ काढलं …. आणि वही बंद करून टाकली. 

Wednesday, July 26, 2017

There should be a reading day!!

The man who does not read has no advantage over the man who cannot read. -Mark Twain 
Organizations often arrange events like Fun-Friday, annual day, Business Unit meet etc. sometimes on working days and often on weekends. The idea is to let the people enjoy, give them creative breaks, relaxing experience, free their minds etc.
(I know I am using a lot of etceteras, but obviously there are more terms for such events than I know, so please bare with me and the few upcoming etceteras)
There are also events like coding competitions, coding challenges, Hackathons, bug-hunts etc. which intend to take the employees out of their day-today work, or sometimes make them work with competition in mind, to let them shape their own ideas etc.
I have a thought and a strong opinion about it!
why there shouldn't be a reading day? 
I am sure nowadays people do read a lot of blogs, e-books, kindle books etc. and share a lot as well, but I always have at least 10 articles or blogs that I have bookmarked and I postpone to read them in my leisure time which doesn't come easily!
So, to encourage reading (and not just to help finish the backlogs), I think there should be at least a day in the year, where all the employees would come to their work-place, but would only do the reading during the work-hours. They should be reading whatever they want, however they want! Of course people will discuss with colleagues, read in groups, exchange books, blogs, articles etc. but there should not be any coding, code reviews, testing, automation, stand-ups, management, business analysis, data analytics, presentations etc. and definitely no meetings.
It Should Be A Complete Reading DAY!!
This can also be put in different scales like, "one hour in a month", or "last 2 hours on last Friday of the month", "One day after you achieve a milestone" etc. but it SHOULD be experimented.
After the thought came to me, I pondered the cons of such a reading-day-event, but then again, I felt all the cons would equally apply to the above mentioned other events as well.
Not surprisingly, this thought was followed by a second thought to write a blog post, to gather the opinions of the reading world out here. So please let me know your comments, opinions!
Finally, let me put one of the many interesting quotes from the internet about reading!
Reading gives us Someplace to go when we have to stay where we are! 
Just between you and me, by quoting this quote I am not suggesting that reading day is a perfect alternative for team outings ;)

Saturday, March 4, 2017

People who can change levels are the ones who can raise levels!


I agree the title is confusing! But that's helpful to grab your attention, isn't it?

Let me tell you step by step what and whom am I talking about! 

First of all, this observation comes from a team leader guy who is about to become a manager! This is for those who are transitioning, slowly, but steadily.

I am an average workman in an IT company and I noticed few things!  I have an experience of around 10 years and I interact with a mix of junior and senior colleagues. As part of my job, I have to answer queries from a freshers, interns as well as I am part of product definition discussions with my senior managers having 15-30 years of experience in the IT field.

The fact is while talking to the junior colleagues and answering their doubts, I have to match my level of thinking with theirs, I have to see things from their perspective and then try to answer his/her query. If I answer the person from my perspective, then he/she may not understand it well in the first go. That would result in hesitance from juniors to talk to me next time when they have a doubt.
On the other hand, when I talk with my managers, product definition team, product managers I should try to answer them from their perspective. Obviously the senior colleagues don't bother about small bugs in the system, but they care more about overall functionality achieved, quality targets being met, which modules are working, which modules are affected due to bugs, what is the effect on our release cycle etc. I generally shouldn't bother them about the minute details of the software/s, unless they show the interest (that saves time for both of us). Unnecessary dragged discussions filled with too much detailing would make the discussion boring

Fruitful discussions with your juniors increase depth of your knowledge in particular area.
Fruitful discussions with your seniors increase width of your knowledge (And it is your duty to make sure your juniors also get same experience when they interact with you :) ).

To summarize, If you interact with people by bringing yourself at appropriate levels, you'd be involved in more and more fruitful discussions which would lead to increase in your knowledge. You'll get a lot of exposure which would raise your level ultimately!

Hope this makes sense!

Wednesday, September 7, 2016

The final meeting

I have been doing a lot of ‘final’s these week, final dinner with team, final lunch with friends, final tea etc etc. Can I give this all a break and take a little de-tour to tell you all something I realised? I hope I have that freedom, this being my “Final” meeting with THIS team.
Anyways, here it is! 
For last couple of days my daughter, who is in Kolhapur with her mother and grandparents, has been suffering from some kind of viral reaction or allergy or increased heat or something creepy which has caused her mouth to be full with ulcers and she hasn’t been eating or drinking anything. My wife has been keeping me posted on WhatsApp and over phone. And I was worried about my daughter too. So yesterday night, before I start eating my bachelor-day-food noodles, I got a call from my wife and again we discussed my daughter’s health and she gave me the good news that Rucha, my daughter has been feeling better and has been feeling less pain in her mouth and has started eating rice, thanks to the medication!
Just by hearing this over phone, I felt so relaxed and was so overjoyed that I didn’t even realise when my eyes got full with tears. The sheer joy of my daughter recovering from sickness made me realise how much I care for her and how much her happiness and wellness means to me and my eyes were full with tears of happiness. 
Such moments are the real gems of life, they are the moments which we cherish and they make us human beings.
Now the reason why I told you this all is… nothing, I just wanted to blurt my heart out to all of you people with whom I have been working for last many years.
But apart from that I also wanted to tell you that I also have got a lot such cherish-able moments here in this company and I am deeply grateful for that.

And since I am going to remember you all with all the good moments we shared, good laughs we had, I wanted you all also to do the same and stay in touch. Hence on this very positive note, I say thank you again and let me get back to the final day formalities!

Tuesday, May 27, 2014

हुरहुर


सकाळची साडेअकराची वेळ, स्वारगेटचं बस स्थानक! चिंचवडकडून कोल्हापूरला निघालेली आमची गाडी स्थानकात शिरली आणि तिथली अशक्य गर्दी पाहून सगळेच चपापले, अर्थात वाहक व चालक सोडून. खरं तर वाढती लोकसंख्या, शहराकडे धावणारी तरुणाई आणि दूरदृष्टीचा अभाव असणारं राज्यतंत्र पाहता शनिवारी अशी गर्दी असणे साहजिक आहे, पण दोनच दिवसांनी होणारं गणरायाचं आगमन हे हि त्याला कारणीभूत होतं.गाडी थांबली तशी दारात ही गर्दी जमली आणि वाहकानं निर्विकारपणे "फक्त reservation असणारयांनीच चढा" अशी घोषणा केली. तरीपण "standing allow आहे काय?" असा अर्धवट इंग्रजीतून प्रश्न एका अर्धवट माणसाने विचारलाच. यथावकाश गाडी भरल्यावर पुढं चार, मागे चार आणि मध्ये दोघे तिघे जण  उभ्यानेच प्रवास करण्यासाठी चढले.

माझ्या जागेच्या थोडं पुढे एका आजोबा उभे राहिले. धोतर आणि गांधीटोपी बघून ते एखाद्या खेड्यातून आले असावेत असं जाणवलं. मी तिशी जवळ पोचलेला, तर ते साठी पार केलेले वाटले. मागे वळून त्यांनी कुठे जागा शिल्लक आहे का बघितलं पण कुठं जागा नसल्यामुळे ते उभेच रहिले. त्यांना आपली जागा द्यावी का असा विचार माझ्या मनात आला पण ते कुठवर जाणार आणि उभं राहून जाण मला जमेल कि नाही या  शंकेमुळ मी बसूनच रहिलो. आजुबाजुला बघितलं तर संगणकीय आरक्षण केलेले माझ्यासारखे बरेच तरुण बसून होते, स्वतःच्या आणि बाकीच्यांच्याही कोडगेपणाला नावं ठेवत मी खिडकीतून बाहेर बघत रहिलो. शहरातून प्रवास करताना अर्ध्या तासाचं अंतर असेल तर मी वृध्दांना जागा देत असे, पण इथं अंतर खूप होतं. आणि माझं मन मला स्वस्थ बसू पण देत नव्हतं. अशा बाक्या प्रसंगातून सुटका म्हणून मी झोपेचा रामबाण उपाय स्वीकारला. थोड्या वेळानं गाडी भोजन विश्रांतीसाठी थांबली. जेवण झाल्यावर पण मी माझ्या जागी डोळे मिटून बसून रहिलो.
पण निद्रादेवी मला काही पावेना, त्यामुळे मी मनाचा हिय्या करून उठलो आणि त्या आजोबांना विचारलं "तुम्हाला कुठे जायचं आहे?". तेही कोल्हापुरलाच जाणार होते, म्हणजे अजून किमान ३ तास उभारावं लागणार होतं. तरी पण मी त्यांना माझ्या जागी बसायला सांगितलं आणि बाजूला उभा राहिलो. ते "नको, नको" म्हणू लागल्यावर मी त्यांना म्हटलं "तुम्ही बसा, माझे पाय दुखू लागले कि मी सांगेन". त्यावर मग ते तयार झाले आणि माझे आभार मानून जागेवर बसले. त्यांना आराम मिळाल्याचं बघून आणि आपल्या हातून एक चांगलं काम घडल्याच्या आनंदात मी उभा राहिलो. बाजुच्या १-२ प्रवाशांनीहि माझं कौतुक केल्यामुळे तर माझे सगळे श्रम नाहीसे झाले. त्याच आजोबांशी गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता कळलच नाही.
"उठा आता, आलं कोल्हापूर", माझा सहप्रवासी मला उठवत होता, मी चमकून इकडे तिकडे बघितलं, तर ते आजोबा ज्या जागी उभे होते तिथेच बसले होते, कोल्हापूर आलं म्हटल्यावर तेही उठून उभे राहिले. आधीच आळसावलेल माझं शरीर मला आणखीनच जड वाटू लागलं. जेवण करून आल्यावर कधी झोपलो आणि कधी स्वप्नात शिरलो ते मला कळालच नाही. चांगलं काम करायची संधी दवडल्याची हुरहुर माझ्या मनाला लागून राहीली. आपल्याच क्रीयाशून्यतेचि जखम सोसत मी गाडीतून खाली उतरलो, पाय जमिनीवर टेकवले आणि घराकडे निघालो.