*******************
"आरं २-४ खिळे जास्तच पेरत जा लेका …. आपण ४ खिळे टाकले कि त्यातला एखाद-दुसरा कामाला येतो … नको तिथं आळस करत जाऊ नगो"… परश्या आपल्या पोराला सकाळी सकाळी दटावत होता.
"कालचा खिळा त्या गिऱ्हाईकान कुट टाकला काय कळना …. गावलाच न्हाई … आणि आजकाल राजूदादा पण खिळ्याच पैशे जास्त घेतूया …. नवीन खीळे आणणार तरी कुठनं?" सदा पण वैतागून उत्तरला…
"या धंद्यात काय बरकत न्हाय … आपली शेती बरी होती लेका, जाऊदे पण आता काय करणार … १० रुपये जास्तच लावू पंक्चर काढायचे"… असं म्हणून परश्यान दुकान उघडलं आणि उदबत्ती पेटवून देवाच्या तसबिरींना ओवाळायला सुरुवात केली.
सदानं त्यावर काही न बोलता पेपर उघडून वाचायला सुरुवात केली, तेवढ्यात कोणीतरी गिऱ्हाईक आलेलं दिसलं, 'चला पहिली भवानी तर झाली' म्हणून तो उठला आणि कामाला लागला…

"जास्त वेळ बोलू शकणार नाही … आज डॉक्टर जरा घुश्श्यातच आहेत…. एवढ्यात कोणी पेशंट आला तर प्रोब्लेम होईल… चल बाय नंतर बोलू" असं म्हणून मोहिनीने गडबडीने फोने ठेवून दिला.
तेवढ्यात तिच्या टेबलावरचा फोन वाजला, "हा डॉक्टर … हा ठीक आहे, हो चालेल. हा मी लक्षात ठेवून करेन सर. "
केसपेपरची किंमत १३० वरून अचानक १५० का केली डॉक्टरांनी याचा काही मोहिनीला उलगडा झाला नाही. तिने मात्र पडत्या फळाची आज्ञा मानून लक्षात राहण्यासाठी नवीन केसपेपरवर जास्तीची किंमत लिहून ठेवली.

******************
"हे बघा, मला आजच आलेला अनुभव आहे … नुसते कानाला हात लावून बघायचे १५० रुपये घेतले डॉक्टरांनी … केसपेपरचे दीडशे वेगळे! कुठल्या जमान्यात आहे राव तुम्ही…. ३ किलोमीटर साठी १० नाही १५ रुपये लावत चला… " युनियन लीडर संग्राम आज भलत्याच जोशात आला होता.
"वाढत्या महागाईत वाहून जाल नाहीतर तुम्ही लोक सुध्दा …. हे बघा मतदानघेऊ, ज्यांना १५ रुपये रास्त वाटतात त्यांनी हात वर करा "
"व्हय …. महागाई कशी मारुतीच्या शेपटावाणी वाढतच चाललीया … " एरवी अबोल असणाऱ्या धोंडूनानांनी आज संग्रामची री ओढली आणि हात वर केला.
मतदान झालं, आणि संग्रामच्या अपेक्षेप्रमाणे दरवाढीचा प्रस्ताव अधिक करून रिक्षाचालकांनी उचलून धरला

"आज परत बटाटा? संपतोय का नाही त्यो?" दिवसभराच्या कामाला वैतागलेला परश्या बायकोवर खेकसला.
"आता तुमास्नी आणि काय सांगू, नेहमीची बाई जिच्याकडन भाजी घेते ती दर कमी करायलाच तयार नाई! सगळ्या भाज्या अशाच २० आणि ३० रुपायला पावशेर …. परवडायचं कसं वो? आणि वर मलाच म्हणतीया कि बाई रिक्षाच भाडं बी डबल झालंया, मी भाजी जुन्या दरान कशी विकू?"
"मग काय बटाटा जास्त घेऊन आले परत!"
काय बोलावं काहीच न समजून, परश्याने नुसता हुंकार भरला आणि जेवायला सुरुवात केली.

*****************
"एक चहा द्या मज आणुनी …. पिईन मी तो स्वप्राणाने "…. डॉक्टरांनी बूट काढता काढताच ओर्डर सोडली, "खूप वैताग आला राव आज… "
थोड्या वेळाने त्यांच्या पत्नीने चहा आणून दिला आणि विचारलं "का, काय झालं? पेशंट जास्त होते काय आज?"
"नाही फारसे नाहित… पण सकाळी निघालो आणि अर्ध्या वाटेत चाक पंक्चर झालं …स्टेपनीच चाक म्हणजे जुनंच होतं, ते पण पंक्चर झालं म्हणून काढून ठेवलेलं आणि त्याचं पंक्चर काढायचं राहून गेलं होतं…
दोन्ही चाकांच पंक्चर काढून घ्यावं म्हणून एका पंक्चर वाल्याकडे गेलो, तर त्याने दोन्हीचे मिळून दोनशे घेतले. बोटाएवढा खिळा निघाला चाकातून! त्यातच वेळ गेला बराच. "
"हं … आणि मोहिनी काय म्हणते … तिला काय सांगितलं? पगार वाढवून मागत होती ना ती?"
"होय …. दोन आठवड्यापासून विचारते आहे. वाढवतो एवढंच बोललो परवा तिला. नक्की आकडा ठरवला नाही अजून मी पण. "
अशा इकडच्या तिकडच्या गप्पा मारत चहा झाल्यावर डॉक्टरांनी विचारलं, "चिरंजीव कुठायत? किती वेळ खेळत असतोय हा?"
"आला आहे हो… समोरच्या आजोबांकडे गेलाय. त्याला शाळेत निबंधस्पर्धेसाठी एक निबंध लिहून हवाय मराठीमधून … त्यांच्याकडून मदत घेणार आहे. ते आजोबा मराठी मेडियम मधून शिकलेत ना!"
"मराठी मेडियम?? काहीही काय? माझंही मराठी चांगलंच आहे. मी पण मदत करू शकतो …. मला पण एक कागद, पेन आणून दे प्लीज!"

पेन आणि वही आणून देताना "त्याचीच वही आहे … विषय लिहून ठेवलाय बघा त्याने ", असं सांगून बायको आपल्या कामाला निघून गेली.
वहीच्या पानावर "महागाई आणि समाजाची बदलती मानसिकता" एवढंच लिहिलं होतं आणि पूर्ण पान कोरं होतं ….

कितीतरी वेळ त्या मोकळ्या पानाकडे बघितल्यावर त्यांनी तिथे हातानेच एक वर्तुळ काढलं …. आणि वही बंद करून टाकली.
No comments:
Post a Comment